Sunday, May 1, 2016

All about me: नसतेस घरी तू जेव्हां

All about me: नसतेस घरी तू जेव्हां:                                         खरतर खूप दिवसांनी लिहतो आहे ,कारण विशेष नाही फक्त एकटेपणा ,दोन एक आठवड्यां पासून  मी अगदी एकटा होतो...

नसतेस घरी तू जेव्हां

                                        खरतर खूप दिवसांनी लिहतो आहे ,कारण विशेष नाही फक्त एकटेपणा ,दोन एक आठवड्यां पासून  मी अगदी एकटा होतो घरी.डोक्यात विचार चक्र फिरली नेहमी प्रमाणे आणि लिहायला  सुरुवात केली. नॉर्मली बायको आणि तीची सासू घरी नसणे हा लग्न झालेल्या प्राण्याच्या आयुष्यात अतुलनीय पर्वणी असते.साहजिकच मी खूप प्लान्स बनवले.माझ्या आवडत्या मूवीज , NAT GEO episodes ,without break बघण्याचा माला फार दिवसांनी संधी मिळणार म्हणून खूप आनंद झाला होता. (एरवी या सगळ्या गोष्टी मी छोटा भीम ,डोरेमॉन  आणि" बीबी" टीवी यांच्यामध्ये दैव आणि  परिस्थिती यांनी  साथ दिल्यास बघतो). 
                                      अथार्त माझा आनंद फार अल्प जीवी होता. फार थोड्या वेळात मलाच याचा कंटाळा आला. टीवी , इंटरनेट ,यूट्यूब ,आवडते रेडियो स्टेशन्स , टी 20 matches ,सगळा पसरा मांडून बसलो होतो.मन नाही रमल कारण  ही सगळी साधने फार एकतर्फी ,एकसुरी संवाद  करतात.
                                      
"घर आणि पसारा आवारा" अस  सांगणार कोणी माणूस घरी नसतो त्याच वेळी तीची खरी उणीव भासते.कारण मनाचा पसारा आवरण जास्त अवघड असते .  प्रेम असण्याची भावना  त्यातल्या मैत्री मुळे ,आदरामुळे ,वेगळ्याच स्थानावर जाते.कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तु  त्याची जागा घेऊ शकत नाही. संवाद आणि स्पर्श याशिवाय कोणीतरी आपली व्यक्ती  बरोबर आहे ही जाणीव मोठा मानसीक आधार असते.
                                                 माझ्या भोवती सतत मी तीच , माझ्या पिल्लूच आणि आईच असण्याला खूप miss केल.घरात यासगळ्यांची  प्रत्येकाची unique जागा , आस्तित्व असते ,माणूस /व्यक्ती म्हणून मी अपूर्ण आहे तुझ्या शिवाय !! तुझी जागा आणि माझे जग खूप एकरूप झाले आहोत अपण .

माझे हे व्यक्त होणे तुझ्या साठी आहे सौ. आणि तुझ्यातल्या माझ्यासाठी !!

तुझा ,

समीर
                                 


Sunday, August 9, 2015

All about me: " PAHILA -BLOG"

All about me: " PAHILA -BLOG":            खुप दिवस जाले

" PAHILA -BLOG"

           खुप दिवस जाले "ब्लॉग "नावाच्या प्रकराला वापरून बघवा अस वाटत होते, आज तैशी  संधी चालून आली .खरतर मी कही खुप "एक्सपर्ट "लिहणारा नाही,पण आमचा जूना मीत्र "आनंद मोने " यांचा ब्लॉग पेज पाहिला आणी व्यक्त कराव असा बराच काही अपल्या कड़े असत याची जाणीव झाली .
                      सध्या मी आमच भर पुण्यातला घर सोडून ( पुणे ३८)  सोडून चाकण (पुणे ५१०) इथे वास्तव्या साठी आलो आहे . खरतर या निर्णय घेण्या पूर्वी मनात खूप धास्ती होती पण  "चुकोनी आढळते उदंड " म्हणतात ते उगीच नाही . नवीन राहत्या  घरातून नजर टाकली की दूर वर पसरलेली शेत दिसतात . पुढे जाणऱ्या प्रत्येक दिवसागणीक मी नवीन काही अनुभवतोय . मी या नवीन ठिकाणी आलो तेंव्हां नुकतीच कापणी झाली होती ,माझ्या शेड म्याचिंगच्या भाषेत सांगायचं झालं तर "YELLOW CROMA "  च्या इतक्या TONES जमिनीवर पसरल्या होत्या की एका नजरेत सारा COLOR PALLET बसण देखील मुश्कील . माझ्या कामातला मी १७~ २५ शेड्स MATCH केल्याचा दुराभिमान नकळतच मागे पडला .

                                                           शाळेत लिहलेल्या "माझा आवडता ऋतू - पावसाळा "याच्या पलीकडे जावून  मला पावसाला अनुभवायला मिळाल आहे . समोरच्या शेतातली रोपटी इवलीशी कशी असतात ,त्याची पेरणी कशी होते ,नांगराच्या  मागे बगळ्यांची रांग पळत जाते ,अशी अनेक दृष्य मी मनाच्या कॅमेरा वर साठवू  शकलो,अनुभवू शकलो . मन मोकळ झालं आणी नजर विस्तारलीकी जागण्या विषयीच्या ,सुखदुख संदर्भात आपल्या भ्रामक कल्पना मागे पडतात . शेतातली रोपटी जन्म ,तारुण्य ,वार्धक्य  आणी मृत्यू या सगळ्या अवस्था मधून जातात. या प्रत्येक अवस्थेत ती सुंदरच दिसतात . या प्रत्येक अवस्थेत ती आपल स्व-वैषीस्थ   आणी निर्सर्गाशी साधर्म्य जपून असतात . प्रत्येक पान "UNIQUE "असत ,तरी त्याच्या "unique "पणा सकट एका झाडच असत.
                           आपण सर्वजण खरतर "UNIQUE "पणा जपण्याच्या नादात ,आपल्या कौटुंबीक ,सामाजीक जाणीव सर्धम्याला मागे टाकत चाललो आहोत. मन अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य शेतातल्या रोपट्यांनी दाखवलं आणी "आनंदाची" व्याख्या बदलली . THANKS "आनंद मोने "!!!